केंद्र आणि राज्ये यांच्यातील मानापमान नाट्ये आणि एकमेकांना खिंडीत पकडण्याचे डावपेच लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत
स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही टिकावी व वृद्धिंगत व्हावी यादृष्टीने संघराज्यसदृश प्रणाली अंगीकारली गेली. याद्वारे केंद्र बळकट करण्यावर भर दिला गेला असला, तरीही काळानुरूप राज्यांनाही अधिक स्वायत्तता देणे, हे लोकशाहीच्या सबलीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. लोकशाही ही एका वृक्षाप्रमाणे आहे. एखाद्या वृक्षाची मुळे जमिनीत जितकी खोल जातात, तितकाच तो वृक्ष डेरेदार होतो.......